नितेश राणे अज्ञातवासात, पोलिसांकडून शोध सुरू

नितेश राणे अज्ञातवासात, पोलिसांकडून शोध सुरू

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरू असून नितेश राणेंचे वकील आणि सरकारी वकील यांनी युक्तिवाद लढवला. मात्र मागील तीन दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात असून पोलिसांकडून नितेश राणेंचा शोध सुरू आहे.

काल न्यायालयात सरकारी वकील घरत आणि नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद लढवला. यावेळी दोन्ही वकिलांनी बाजू मांडली असून आज पुन्हा नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नितेश राणेच अज्ञातवासात असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणाणी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version