जालना जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
जालना जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

जालना : जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यात दोन दिवस येलो अलर्ट जारी केल्याने या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.  

हेही वाचा : सुरत आणि अहमदाबादमध्ये घुसखोरांवर कारवाई; दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात

यापूर्वी 22 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला होता. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढलं असून सकाळपासूनच नागरिकांना एप्रिल हिटचा तडाखा बसू लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्याचं तापमान हे 36 ते 38 डिग्री सेल्सियसच्या घरात राहिलं आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच तापमान 41 अंशावर जाऊन पोहोचलं आहे. त्यामुळे याचा फटका जनजीवनावर बसू लागला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version