यवतमाळ एका मृत्युससह जिल्ह्यात 68 जण पॉझेटिव्ह 77 जण कोरोनामुक्त

यवतमाळ एका मृत्युससह जिल्ह्यात 68 जण पॉझेटिव्ह 77 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 68 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ तालुक्यातील 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 77 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 487 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 68 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 468 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14375 झाली आहे. 24 तासात 77 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13481 आहे. तर जिल्ह्यात एकूण 426 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 142253 नमुने पाठविले असून यापैकी 141987 प्राप्त तर 275 अप्राप्त आहेत. तसेच 127603 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version