जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असाताना एका कुटूंबानं चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.
वेळ राहताच पोलिसांना त्यांना थांबवले. परभणिच्या अखीला बेगम खानं यांच हे कुटूंबं आहे. गेल्या वर्षी अखिला खान यांच्या पतीला चौकशीसाठी पोलीस परभणी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.
मात्र, पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुर्नवसनासाठी त्यांच्या परिवाराला कोणतीही शासकीय मदत न मिळाल्यामुळ त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.