Thane Crime: ठाण्यात फॅमिली कोर्ट परिसरातील कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी पीडितेला केकमधून दिलं गुंगीचे औषध

हिरालाल केदार आणि रवी पवार या दोघांवर कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुंगी आल्याने पीडित महिला प्रतिकार करू शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
Thane Crime: ठाण्यात फॅमिली कोर्ट परिसरातील कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी पीडितेला केकमधून दिलं गुंगीचे औषध

Thane Crime: ठाणे शहरात फॅमिली कोर्टाच्या आवारात घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कोर्टात उभी असलेल्या कारमध्ये दोन व्यक्तींनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी एका केकमध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळून महिलेची शुद्ध हरपली आणि त्यानंतर दोघांनी मिळून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. 

हेही वाचा – Sindhudurg Crime News: शिकार समजून नेम साधला, अन् झाडलेली गोळी लागून एकजण ठार

प्राप्त माहितीनुसार, ही घृणास्पद घटना 25 ऑगस्ट रोजी घडली. बदनामीची भीती आणि मानसिक धक्क्यामुळे पीडितेने त्वरित पोलिसांकडे धाव घेतली नव्हती. पण घटना घडल्यानंतर आरोपींकडून वारंवार धमक्या आणि ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यामुळे अखेर महिलेने धैर्य दाखवत 5 डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – Vasai Big News : रमाबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी वसई-विरार पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गोन्सालविस यांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल केदार आणि रवी पवार या दोघांवर कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुंगी आल्याने पीडित महिला प्रतिकार करू शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीची कारवाई करत हिरालाल केदारला अटक केली असून दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरातच अशी गंभीर घटना घडल्याने शहरातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. तथापी, ठाणे पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version