बायको शेर तर नवरा सव्वाशेर,पहा व्हिडिओ

बायको शेर तर नवरा सव्वाशेर,पहा व्हिडिओ

मुंबई , २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देताना दिसतात. यात हि एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्या नारकर यांनी स्वत:ला खूप छान फिट ठेवले आहे. बऱ्याच वेळा समाज माध्यमांवर त्यांचे योगरासनाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु केवळ ऐश्वर्या नारकरच नाही तर त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकरदेखील फिटनेसच्या बाबतीत त्यांच्या इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक काटेकोर आहेत.


आजवर आपण बऱ्याच वेळा अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना योगासने करताना पाहिले आहे. परंतु अलीकडेच त्यांचे पती अविनाश नारकर यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. ‘योगा म्हणजे वर्क आऊट नाही तर वर्क इन’ असे म्हणत अविनाश नारकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ सामाईक केला आहे. या व्हिडिओत ते कपालभाती हा योगा अभ्यास करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते चकीत झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version