अनिल परब यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? – किरीट सोमय्या

अनिल परब यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? – किरीट सोमय्या

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधेलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती शासनाने दिली होती. भाजप नेते किरटी सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांच्यासमोर याप्रकरणाची ऑनलाईन सुनावणी झाली. तसेच आज परब ग्रुपच्या अनधिकृत रिसॉर्टसंबंधी पुरावे पोलीस ठाण्यात सुपूर्द केले असूनही अनिल परब यांच्यावर एफआयआर दाखल का होत नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

अनिल परब ग्रुपच्या अनधिकृत रिसॉर्ट विरोधात आज सकाळी पुन्हा एकदा दापोली पोलीस ठाण्यात पुरावे सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच दापोली रिसॉर्टच्या बेकायदेशीर बांधकामात फसवणूक, खोटारडेपणा करण्यात आला असल्याचे किरिट सोमय्या यांनी सांगितले. यापूर्वी २ जून २०११ रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आणि आज पुन्हा बेकायदेशीर रिसॉर्टचे पुरावे दापोली पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले आहेत. तर याप्रकरणी अनिल परब यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

अनिल परब यांनी दापोलीत बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल खात्यांनी लोकायुक्तांसमोर दिल्यामुळे आता दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version