हॉलिवूडचा टॉम क्रूझ भारतात ट्रेंडिंग का ?

हॉलिवूडचा टॉम क्रूझ भारतात ट्रेंडिंग का ?

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ याचा आगामी ‘मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ या अॅक्शन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या दरम्यान त्याच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत टॉम क्रूझला विचारण्यात आले की तो हिंदीत बोलू शकतो का? या प्रश्नावर त्याने दिलेल्या उत्तराने संपूर्ण समाज माध्यम दणाणून सोडला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय चाहत्यांचा आनंद तर शिगेला पोहोचला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये टॉम क्रूझने जेव्हा विचारले गेले की, ‘तुम्ही माझ्याशी हिंदीत बोलाल का?’ तेव्हा क्रुझने उत्तर दिले, ‘जर मी तुमच्याशी हिंदीत बोलावे अशी तुमची इच्छा असेल तर मी नक्की बोलेन.’


टॉम क्रुझने ‘नमस्ते, कसे आहात?’ असे हिंदीत म्हटल्यानंतर समाज माध्यमांवर त्याचे जोरदार कौतुक होत आहे. टॉम क्रूझच्या आगामी चित्रपटात, त्याच्या टीमने आतापर्यंतचे सर्वात धमाकेदार ऍक्शन सीन शूट केले आहेत. रेबेका फर्ग्युसन, सायमन पेग, हेली एटवेल, व्हेनेसा किर्बी, हेन्री झेर्नी, पॉम क्लेमेंटिफ, एसाई मोरालेस, शी व्हिघम, ग्रेग टार्झन डेव्हिस, कॅरी एल्वेस, फ्रेडरिक श्मिट आणि मेरीला गॅरिगा हे कलाकार सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version