अक्षय्य तृतीयेला इतके महत्व का?

अक्षय्य तृतीयेला इतके महत्व का?

हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुक्ल पक्ष तृतीया हा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. हा दिवस व्रत आणि सण म्हणून साजरा केला जातो. आता अक्षय्य तृतीयेचे महत्व सांगायचे तर अक्षय्य शब्दाचा अर्थ ‘कधीही नाश होत नाही असा’.त्यामुळेच या दिवशी केलेला जप, दान आणि ज्ञानग्रहण हे अक्षय्य फलप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे संबोधले जाते.

भविष्यपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण आणि स्कंदपुराणात याचा विशेष उल्लेख केलेला आढळतो. पुराणात अक्षय्य तृतीयेच्या अनेक कथा प्रचलित आहेत.यातील काही कथा म्हणजे, अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते.याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतरात प्रकट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी जगाला प्राप्त झाली. तसेच याच दिवशी नर-नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले म्हणून आजचा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा होतो. यामुळेच अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा कोणत्याही मंगल कार्यासाठी शुभ मानला जातो

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version