Bhagyashree Pathwardhan : सांगलीत भाग्यश्रीच्या गणपती आरतीने नवा वाद; अभिनेत्री 4 वर्षानंतर पोहोचताच पटवर्धन कुटुंबात नेमकं घडलं काय?

सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये गणेशोत्सवाच्या अगदी सुरुवातीलाच कौटुंबिक आणि प्रशासनकीय वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे. संस्थानकच्या उत्तराधिकारी पदावरुन आणि पूजेच्या मानावरुन हा व
Bhagyashree Pathwardhan : सांगलीत भाग्यश्रीच्या गणपती आरतीने नवा वाद; अभिनेत्री 4 वर्षानंतर पोहोचताच पटवर्धन कुटुंबात नेमकं घडलं काय?

Sangli Ganpati Sansthan Dispute : सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये गणेशोत्सवाच्या अगदी सुरुवातीलाच कौटुंबिक आणि प्रशासनकीय वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे. संस्थानकच्या उत्तराधिकारी पदावरुन आणि पूजेच्या मानावरुन हा वाद निर्माण झालेला होता. प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी तब्बल 4 वर्षानंतर सांगलीत येऊन गणपती मंदिरातील मूर्तीची आरती केली. मात्र, याच संस्थानचे सध्याचे कायदेशीर असलेले उत्तराधिकारी युवराज आदित्यराजे पटवर्धन असताना भाग्यश्री यांनी आरती केल्याने मंदिर व्यवस्थापन तसेच भाग्यश्री यांच्यात शाब्दिक वाद झाला. या घटनेनंतर गणेशोत्सवाच्या दिवसात मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरं तर सांगली संस्थानच्या कारभारावरुन हा वाद अलिकडचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

पटवर्धन कुटुंबात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 2013 ते 2016 या वर्षात श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी या संस्थानच्या कारभाराची जबाबदार भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे सोपवली होती. मात्र, संस्थानच्या असलेल्या जमिनी या परस्पर विकल्याचा आरोप करत विजयसिंह राजे यांनी हिमालय दासानी यांच्याकडील अधिकार काढून घेतले. त्यानंतरच भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांनी सांगतील येणे बंद केले होते.

हेही वाचा-BIG BREAKING: आंदोलनासाठी मनोज जरांगे एकटेच निघणार! मुंबईत पोहोचल्यावर…; 18 व्या दिवशी नवं वळण?

त्यानंतर 2016 ते 2021 या वर्षात विजयसिंह  राजे यांनी संस्थानचा स्वत: कारभार पाहिला. 2021 मध्ये कारभार हा जयदीप अभ्यंकर यांच्याकडे सोपवला. पुढे 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांच्या 16 वर्षीय मुलाला आदित्यला दत्तक घेण्यात आले होते. त्यानंतर विजयसिंह राजे यांनी त्याला संस्थानचा अधिकृतच उत्तराधिकारी म्हणून घोषित करुन टाकले. आदित्यराजे पटवर्धन हे सध्या या संस्थानचे कायदेशीर उत्तराधिकारी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

आरतीच्या वादावर भाग्यश्रींचं स्पष्टीकरण
यंदा चार वर्षांनंतर आलेल्या भाग्यश्री यांनी आरतीच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वडिलांची प्रकृती चांगली नसल्याने गणपती उत्सवाची जुनी परंपरा कायम ठेवण्यासाठी तीन मुलींपैकी कोणीतरी उपस्थित राहणे यंदा आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, आदित्यराजे यांच्या उत्तराधिकारी पदाबाबत त्यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले.

हेही वाचा-Sambhajinagar Accident : भीषण अपघात! भरधाव कंटनेर मिरवणुकीत घुसला, दुचारीस्वारांना चिरडत गेला; 2 शेतकरी ठार, तर 12 जण जखमी

भाग्यश्रींवर ….आरोप
दुसरीकडे, विजयसिंह राजे या संपूर्ण प्रकारावर भावूक झालेले दिसून आले. भाग्यश्री आणि त्यांच्या पतीकडून संस्थानच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, त्यामुळेत त्यांना जबाबदारीतून हटवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून आदित्यराजे यांना दत्तक घेऊन नियमाप्रमाणे उत्तराधिकारी घोषित करण्यात आलेले सांगत, भाग्यश्री यांनी त्यांना मान्यता देऊन टाकावी आणि विनाकारण त्रास देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version