रशिया-युक्रेन युद्धात मंगळवारी काय घडलं?

रशिया-युक्रेन युद्धात मंगळवारी काय घडलं?

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. तर दिवसेंदवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र होत चालले आहेत. अशातच, युक्रेनही माघार घेण्यास तयार नसून जशास तसे उत्तर देत आहे. युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी युद्धात काय घडले?

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच.


रशियाच्या फौजांचा ताफा युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने.


खारकीव शहरावर रशियाचा क्षेपणास्र हल्ला.


खारकीव हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी ठार.


ओखत्यार्कातील लष्करी तळावर हल्ला; युक्रेनच्या ७० सैनिकांचा मृत्यू.


रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले; युक्रेनचा दावा.


रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जात असल्याचा युक्रेनचा आरोप.


ऑस्ट्रेलियाकडून युक्रेनला लष्करी मदतीची घोषणा.


रशियात चित्रपटांच्या प्रसारणावर बंदी.


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी वायुदल सज्ज.


भारतीयांना घेऊन परतणारे नववे विमान मुंबईत दाखल.


युक्रेनमधील २१८ जण इंडिगो विमानाने दिल्लीत.


युरोपियन महासंघाने युक्रेनचा सदस्यत्वाचा अर्ज स्वीकारला.


 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version