Weather Update: आज कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरी? महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आज विजांसह सरींची शक्यता, IMDचा अलर्ट

राज्यातील काही भागांत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाले असून मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू आहेत.
Weather Update: आज कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरी? महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आज विजांसह सरींची शक्यता, IMDचा अलर्ट

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील काही भागांत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाले असून मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू आहेत. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान राहून ऊन आणि सावल्यांचा खेळ दिसू शकतो.

या भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असून 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण ते विदर्भ सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.  

हेही वाचा- Mumbai Local: मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; किरकोळ वादातून धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नसून पुढील काही दिवस कोरडे व दमट उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून, घाटमाथा परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. विदर्भातही हवामानात पुन्हा बदल होत असून, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात पुढील एक ते दोन दिवस विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version