Weather Update : महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यावर दुहेरी संकट! एकीकडे उन्हाने होरपळून काढलं, तर ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचा अलर्ट जारी

राज्यात बदलत्या वातावरणामुळे जनजीवनाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत आहे. राज्यभरात उष्माघाताने आतापर्यंत मृतांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
Weather Update : महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यावर दुहेरी संकट! एकीकडे उन्हाने होरपळून काढलं, तर ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचा अलर्ट जारी

राज्यात बदलत्या वातावरणामुळे जनजीवनाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत आहे. राज्यभरात उष्माघाताने आतापर्यंत मृतांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कामाशिवाय घरातून बाहेर न निघण्याचे आव्हान देखील केले जात आहे. दरम्यान आज राज्यात आकाश निरभ्र वातावरण राहणार असून अनेक भागांत उष्णता कायम आहे.

हेही वाचा- LPG Cylinder Price Hike: निवडणुका संपताच सरकारने दिला मोठा दणका! आता LPG सिलेंडरसाठी मोजावे लागणार 993 रुपये; पाहा नवे दर

मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता कमी असून कमाल तापमान 32-34 अंशांवर आहे त्यामुळे आजपासून पुढे 4 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली परिसरात तापमान 36-39 अंशांच्या दरम्यान राहणार असून मराठवाड्यात कमाल तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत पोहचला आहे.

दुसरीकडे विदर्भात पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून होरपळून काढणारं ऊन अनुभवायला मिळणार आहे. ज्यामुळे विदर्भात काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीसह पश्चिम विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली असून तापमानाने 47 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version