Weather Rain Update: दिलासादायक! काही तासांतच मुंबईसह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

समोर आलेल्या माहितीनुसार,  मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आली आहे.
Weather Rain Update:  दिलासादायक! काही तासांतच मुंबईसह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

राज्यभरात उकाड्याने सर्वच हैराण झाले आहेत. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने उच्चांक गाठला आहे. अशातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईसह कोकणातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आली आहे.

आज सकाळपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असून  पुढील काही तासांत काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.कोकणातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाची एखादी सर, असं वातावरण सध्या कोकणात आहे. 

शुक्रवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होतं. काही उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या, तर शनिवारी सकाळीही अनेक भागांत रिमझिम पाऊस अनुभवायला मिळाला. सकाळी वातावरण आल्हाददायक वाटत असलं तरी काही वेळातच उष्णता आणि चिकट हवेमुळे पुन्हा अस्वस्थता जाणवू लागली.

खोपोली, कर्जत आणि खालापूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगवान वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र या पावसामुळे काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. संध्याकाळच्या वेळी काळे ढग दाटून आल्याने परिसरात अंधार पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version