Weather Update: पुढील काही तास महत्त्वाचे! काही भागात उष्णतेचा तडाखा तर कुठे वादळीवाऱ्यासह गारपिटीचा धोका, प्रशासन सज्ज

आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.  
Weather Update: पुढील काही तास महत्त्वाचे!  काही भागात उष्णतेचा तडाखा तर कुठे वादळीवाऱ्यासह गारपिटीचा धोका, प्रशासन सज्ज

मुंबईसह अनेक राज्यात लोक उष्णतेने हैराण झाले आहेत. गेले दोन दिवस शहरात गर्मीने सर्वच जण त्रस्त झाले आहेत. मात्र आता हवामानात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.  भारतीय हवामान विभागाने आज कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

गेल्या काही तासांपासून हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच पावसासह थेट उष्णतेचाही येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळलेले फायदेशीर असणार आहे. बीड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून पुढील दोन दिवस हवामानाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 24 आणि 25 एप्रिलला तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण भागातील चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

पुढील काही तास राज्यासाठी धोकादायक असणार आहेत. मुसळधार पाऊस गारपिटीसह होण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात आज प्रचंड गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्री पट्ट्यात प्रचंड गडगडाट पाहायला मिळाला. 

 उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 18 अत्याधुनिक उष्माघात कक्ष उभारण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि तालुका स्तरावरील रुग्णालयांमध्ये हे कक्ष कार्यान्वित करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version