मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयाने त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असल्याची माहिती ऍड. रवी पाटील यांनी दिली आहे. तसेच मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिल्यामुळे त्यांचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

ऍड. रवी पाटील म्हणाले, शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात राज ठाकरे हे आरोपी क्र. नऊ तर शिरीष पारकर हे आरोपी क्र. दहा म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश बजावला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. मात्र, राज ठाकरे यांना वॉरंट हुकूम बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना पुन्हा वॉरंट बजावले आहे.

काय आहे प्रकरण?

रेल्वेमध्ये मराठी तरुणांना संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा कलमांतर्गत तसेच सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर शिराळा न्यायालयात खटला दाख झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version