प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलमध्ये हाणामारी

प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलमध्ये हाणामारी

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात गदारोळ पाहण्यास मिळाला. सभागृहात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये राडा झाला. यामध्ये आमदारांचे कपडेही फाडण्यात आले तर एक आमदार जखमी झाला. त्यामुळे या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या पाच आमदारांना निलंबित केले आहे.

सोमवारी प. बंगालच्या विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. बीरभूमच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार आणि भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांनी एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये असित मुजमदार जखमी झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या पाच आमदारांना निलंबित केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version