अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद मतदारसंघात मतदान सुरु

अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद मतदारसंघात मतदान सुरु

अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद मतदारसंघात आज मतदान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील ४ मतदान केंद्रावरून १६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गोपिकीसन बाजोरिया व भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत असून वाशिम जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकात महाविकास आघाडीची सत्ता आहे तर वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून आपापला उमेदवार जिल्ह्यात आघाडी घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मतांची कशा प्रकारे विभागण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर आणि अकोल्यातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान सुरू झाले आहे. अकोला-बुलढाणा-वाशिम ह्या मतदान कार्यक्षेत्र असलेल्या एका जागेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ३६७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १६९ महिला मतदार तर १९८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ११ ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या १२ही केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version