सोलापुरातील बार्शीयेथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल फटेला १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
फरार असलेला विशाल फटे १७ जानेवारी रोजी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. आज विशाल फटे ह्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने उच्चशिक्षित गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल फटेला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेअर मार्केटमध्ये पैसै गुंतवणूक करून मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवत उच्चशिक्षित गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करत गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विशाल फटे फरार झाला होता. दरम्यान, विशाल काल पोलिसांच्या शरण आला असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी आज बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.