मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री उर्वशी रौटेला हिच्या सौंदर्याचे आणि हटके अंदाजाचे लाखो चाहते आहेत. नुकतेच उर्वशीने कान्स महोत्सवात हजेरी लावली होती. त्यानंतर आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिने नुकतेच नवे घर खरेदी केले आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौटेला हिने मुंबईतील जुहू परिसरात नवीन बंगला खरेदी केला. उर्वशीने खरेदी केलेला हा बंगला चार मजली आहे. तर सर्व सोइ सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या बंगल्यात भव्य बाग, वैयक्तिक व्यायामशाळा आहे. या प्रशस्थ बंगल्याची किंमत तब्बल १९० कोटी रुपये आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.