विश्वचषकाचे अंतराळातून अनावरण

विश्वचषकाचे अंतराळातून अनावरण

एकदिवसीय विश्वचषकाचे ४८ सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ४६ दिवस खेळवले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेची सुरुवात पाच ऑक्टोबरला न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.

या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेला सामना म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. मात्र, भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. ८ ऑक्टोबरला चेन्नईत हा सामना खेळवला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version