केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकाराला शिवीगाळ

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकाराला शिवीगाळ

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर कलमे वाढविल्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची अडचण वाढली आहे. अजय मिश्रा यांना लखनऊहून दिल्लीत बोलावण्यात आले. हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा अडकल्यावरून राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर शिवीगाळ केली. मंत्री अजय मिश्रा यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मिश्रा यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा म्हणाले, ‘मीडियाने एका निष्पापाला अडकवले आहे. लाज वाटत नाही, किती घाणेरडे लोक आहेत, दवाखाना आहे, सर्व काही आहे, ते दिसत नाही.’ तसेच एसआयटीच्या अहवालाबाबत त्यांन विचारले असता त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जा आणि एसआयटीला विचारा, हा तुमचा मीडिया आहे आणि याच मीडियाने निरपराध माणसाला गोवले आहे, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे, एसआयटीला विचारू नका… असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांनी याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version