Nagpur Train Accident : भीषण अपघात! रेल्वेची दोन सख्ख्या भावांना धडक, शरीराचे तुकडे विखुरलेले; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकार उडाला

Nagpur Train Accident : भीषण अपघात! रेल्वेची दोन सख्ख्या भावांना धडक, शरीराचे तुकडे विखुरलेले; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकार उडाला

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये भीषण दुर्घटना घडली असून यात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास सावनेर येथे रेल्वे रुळावर ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. निरंजन लक्ष्मण फिरके (वय 40) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय 37) अशी दोन्ही भावांची नावे आहेत. दोघेही सावनेर येथील रहिवासी असलेल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Student Assault: पुस्तक घरी विसरल्याची एवढी मोठी शिक्षा? शिक्षिकेने कानाखाली मारल्याने चिमुकल्याचा दात तुटला

या अपघातात एकाचे दोन्ही हात तुटून पडले, तर दुसऱ्याचे शीर धडावेगळं झाले. छिन्नविछिन्न झालेले ते मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींच्याही काळजाचा ठोका चुकला. याबाबतची माहिती अंकित हांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सावनेर पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version