वसईत आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून मारहाण

वसईत आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून मारहाण

  जयभीम चित्रपटात मांडलेल्या कथेतील पोलिस यंत्रणेच्या मांडलेल्या भयाण वास्तवाची प्रचीती वसईत पाहायला मिळाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे.

  विशेष बाब म्हणजे पोलिसांनी या महिलांना केवळ संशयावरून ताब्यात घेऊन त्यांना मारहाण करून सोडून दिले. या महिलांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका ​दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे कावडास कासा येथील मूळ रहिवासी आहेत. कामासाठी ते पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहतात. या महिला वसईत बिगारी काम करतात. शुक्रवारी या महिला पापडी येथे बाजार भरत असल्यामुळे घरी जाताना बाजारहाट करत होत्या. त्यावेळी काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आले असल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात भरून पापडी चौकीत नेले. आणि येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या साथी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दंडुक्याने मारहाण केली. आणि त्यांच्यावर चोरीचा आळ लावत त्यांना पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version