जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दर रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर असणाऱ्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना होणारा त्रास या रविवारी कमी होणार आहे.
या रविवारी असणारा रक्षाबंधन हा सण मुंबईकरांना आंनदाने साजरा करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या रविवारी म्हणजेच उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना उद्याचा सण अगदी आंनदाने साजरा करता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.