Devendra Fadnavis: ‘1 कोटी खोटारडे लोक मेले तेव्हा हे पैदा झाले…’; विधानसभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि कनेक्टिंग लिंकच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
Devendra Fadnavis: ‘1 कोटी खोटारडे लोक मेले तेव्हा हे पैदा झाले…’; विधानसभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis: मुंबईतील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि कनेक्टिंग लिंकच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. "1 कोटी खोटारडे लोक मेले तेव्हा हे पैदा झाले आहेत," अशा कडक शब्दांत त्यांनी टीकाकारांना सुनावले. मुंबईत पाणी साचणाऱ्या 370 हॉटस्पॉटचा संदर्भ देत ते म्हणाले की, अतिवृष्टीच्या काळातच जर समुद्रात भरती आली, तर अवघ्या 30 मिनिटांत पाणी उपसणे शक्य नाही, असाच तो आराखडा आहे आणि हा आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पावसामुळे झालेले मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने ते गांभीर्याने घ्यावेत, असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत.

'मिसिंग लिंक'च्या कामावरून मविआवर टीका आणि कोकण रेल्वेचा दाखला
कनेक्टिंग लिंकच्या कामावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील दाखले दिले. आघाडी सरकारच्या काळात या मिसिंग लिंक प्रकल्पाची फाईल 14 कारणे पुढे करत बंद करण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला. महायुती सरकारमध्ये धाडस होते म्हणूनच तज्ज्ञांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण केला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता कुठेही तुटलेला नसून केवळ काही भाड्याचे लोक पैसे घेऊन सोशल मीडियावर खोटा प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मला बदनाम करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, अशा अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या संदर्भात त्यांनी कोकण रेल्वेचे ऐतिहासिक उदाहरण देताना सांगितले की, तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी दरड कोसळण्याच्या भीतीपोटी जर प्रकल्प थांबवला असता, तर आज कोकण रेल्वे उभी राहिली नसती. सुरुवातीला तिथेही अडचणी आल्या, पण नंतर तांत्रिक उपाय शोधले गेले.

हेही वाचा – Devendra Fadanvis – Amit Shah Meeting : दिल्लीत शाह-फडणवीसांमध्ये 3 तास खलबतं; 'या' दोन मोठ्या मुद्द्यांवर ठरली रणनीती

अवघ्या 6 दिवसांत महिन्याभराचा पाऊस; मुंबईवर तिहेरी संकट
मुंबईतील पावसाची अभूतपूर्व आकडेवारी सभागृहात मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, जुलै महिन्यात कुलाबा येथे 734 मिमी आणि सांताक्रूझ येथे 856 मिमी सरासरी पाऊस होतो. मात्र, यंदा अवघ्या 6 दिवसांत कुलाब्यात 882 मिमी (111 टक्के) आणि सांताक्रूझमध्ये 988 मिमी (102 टक्के) इतका प्रचंड पाऊस कोसळला. मुंबईच्या एकूण पावसाळ्याच्या तब्बल 41 ते 42 टक्के पाऊस या अवघ्या 6 दिवसांत झाला आहे, जो दिल्लीच्या एकूण पावसाळ्यापेक्षा 117 टक्के तर पुण्याच्या पावसाळ्यापेक्षा 113 टक्के अधिक आहे. या मुसळधार पावसासोबतच 50 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि त्यातच आलेली 4 मीटरची हायटाईड (भरती) अशा तिहेरी संकटामुळे शहरात दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तीव्र दुःख व्यक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version