मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत दिवसाला हजारो रुग्ण सापडू लागल्यामुळे बांद्रा वंडरलॅंडचा प्रकल्प दोन जानेवारीपर्यंत बंद करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरिही मुंबईत नागरिकांच्या गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच राज्य शासनाचे या गर्दीला रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. तसेच नागरिकांच्या गर्दीविरोधात तक्रारी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत गुरुवारी ३ हजार ६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात ८२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी ५ हजाराहून अधिक झाली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात गुरुवारी ओमायक्रॉनचे १९८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईत १९० नागरिकांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४५०वर पोहचली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.