लस न घेणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन रोखणार

लस न घेणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन रोखणार

  कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयांनाही टाळे लागले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर दिवाळीनंतर महाविद्यालयाचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. कोरोना काळात लसीकरण करणे बंधनकारक ठरले. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाल्यानंतर लस न घेणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन पुढील महिन्यात रोखले जाणार असल्याचा निर्णय उच्च-तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांना कोरोना लस घेणे बंधनकारक असणार आहे.

  दीड वर्षानंतर अखेर महाविद्यालयाचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आहे. तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही ऑनलाईन शिकवणी सुरू आहे. त्यामुळे आता ऑनलाईन शिकवणी रोखली जाणार असून ऑनलाईन शिकवणी घेणाऱ्या प्राध्यापकांना लस घेणे बंधनकारक असणार आहे. लस न घेणाऱ्या प्राध्यापकांचे पुढील महिन्यात वेतन रोखणार असल्याचा निर्णय उच्च-तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

  उच्च-तंत्रशिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलत महाविद्यालयाकडून लसीकरणाचा तपशीलही मागविला आहे. तसेच महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्यांनी लस न घेतल्यास पुढील महिन्यापासून प्राध्यपकांचे वेतन रोखण्यात येईल, असे उच्च-तंत्रशिक्षण विभागाने सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version