पोलिसांची वाहने चोरीला गेल्याने परिसरात खळबळ

पुणे पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयाबाहेरून पोलिसांच्या गाड्या चोरीला गेल्या. पुणे शहरातील धक्कादायक प्रकार<br/>समोर आला आहे.
पोलिसांची वाहने चोरीला गेल्याने परिसरात खळबळ

 

 

पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयाबाहेरून पोलिसांच्या गाड्या चोरीला गेल्या. पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुक्तालयाबाहेरील रस्त्यावर पोलिसांच्या लावलेल्या गाड्या चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास तीन गाड्या चोरी गेल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच चोरांनी आव्हान दिले आहे. ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. ३ पैकी एक दुचाकी पुण्यातील एका भागात आढळून आली. याप्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल नाही. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या घरात आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version