राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. त्यात हा निकाल उद्या लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्ववभूमीवर बोलत असताना सत्तासंघर्षाचा जो काही निकाल येईल तो सगळ्यांना मान्य असेल असं वक्तव्य भाजपाच्या राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
१६ आमदारांच्या निलंबनाची जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली होती या याचिकेवर आता सर्व कारवाई पूर्ण झाली असून जो काही निर्णय येईल त्या निर्णयाचा सर्व नागरिक आणि राज्यकर्ते हे सन्मानपूर्वक स्वीकार करतील अशी मी आशा करतो. नागरिक संविधानावर विश्वास ठेवतात ते संविधानावर आधारित न्यायालयीन कार्यालयाचा पण आदर राखतील. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून ज्या दिवसापासून मी स्थान ग्रहण केलं आहे त्या दिवसापासूनच मी जबाबदारीने आपलं काम करत आहे, असं वक्तव्य नार्वेकर यांनी केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.