नव्या डेल्मिक्रॉन व्हेरिएंटचा जगात धुमाकूळ

नव्या डेल्मिक्रॉन व्हेरिएंटचा जगात धुमाकूळ

गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. तर डेल्टा संसर्गामुळे जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तर कोरोनाचा नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगात शिरकाव केला असून देशभरात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आणि आता ओमायक्रॉन विषाणूचा नवा भाऊसुद्धा समोर  आला आहे. डेल्मिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे आता जगातील स्थिती बिघडत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत  आहे.

नव्या डेल्मिक्रॉन व्हेरिएंटने आत जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना संकट संपायचे नाव घेत नाही, त्यातच ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून आता डेल्मिक्रॉन विषाणू जगात हाहाकार माजवत आहे. जगात अमेरिका आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉनची लाट आली असून डेल्मिक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर भारताची ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२०च्या पुढे गेली आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची तिसरी लस म्हणजे बुस्टरडोसची मागणीत वाढ होत आहे. तर इतर देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉन आणि डेल्मिक्रॉन व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओमायक्रॉनने जगाला भीती दाखवण्यास सुरूवात केली आहे त्यातच आता डेल्मिक्रॉन व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. तज्ञाच्या मते डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिळते-जुळते रुप आहे.त्याला डेल्मिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. यावेळी जगभरात दोन्हीही व्हेरिएंटचे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version