चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील धरणाची दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसातच तेथील भराव खचला आहे. मे महिन्यात डागडुजी केलेल्या या धरणाची भिंत मागील महिन्यात खचली होती. त्यामुळे याची डागडुजी सुरू झाली होती. मात्र मागील दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या दुसऱ्या बाजूचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे धरणाला धोखा निर्माण झाला आहे. या धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत लक्षवेधी च्या माध्यमातून केला होता.
यातून धरणाला धोका असल्याचा संभव असल्याने ग्रामस्थांचा रोष वाढू लागला आहे. तालुक्यात कळवंडे येथील धरणक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. धरण झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांना चांगला फायदाच झाला आहे; मात्र सध्याच्या स्थितीला मर्जीतील ठेकेदारास काम देऊन ते निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. ४९ लाखांच्या दुरुस्तीचे काम कळवंडे धरणामध्ये काढण्यात आले. ए
प्रिल महिन्यात संबंधित ठेकेदाराने हे काम केले. मात्र, पहिल्याच पावसात धरणाची डागडुजी खचली. यानंतर कळवंडे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.