डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत कडक थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रूझ येथील भागात 18.4 अंश सेल्सिअस किमान तापमान असून कुलाबा केंद्रात सोमवारी 22.2 अंश सेल्सिअस आणि संपुर्ण मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतक असण्याची शक्यता आहे. त्याचसोबत सपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी 8, 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानेवर्तावली आहे.
विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ येथे 8.8 अंश सेल्सिअस, गोंदिया 9 अंश सेल्सिअस, अमरावती 9.6 अंश सेल्सिअस, नांदेड 9.9 अंश सेल्सिअस, मालेगाव 9 अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर 9.5अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.