मुंबई : काही दिवसांपूर्वी अंधेरी स्थानकाच्या फलाटावर एक व्यक्ती एका मुलीचे ख्रिश्चन धर्मांतर करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवाय माहिम चौपाटीवरही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून आले होते. ठिकठिकाणी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रसार होत असताचाना आता चक्क देवीलाच ख्रिश्चन धार्मिक वस्त्र परिधान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूर वाशी नका परिसरातील काली माता मंदिरातील काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले असून चेंबूर वाशी नका परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिरातील भटजीला विभागातील नागरिकांनी विचारणा केली असता देवी माझ्या स्वप्नात आली असून मला मदर मेरीचे रूप देण्यास सांगितले, असे सांगण्यात आले. परंतू तेथील नागरिकांनी या भटाला पैसे देऊन हे कृत्य करण्यास भाग पाडल्याने सांगितले आहे. या प्रकरणी तेथील काही संघटनांनी जमा होऊन कारवाई करून आरसीएफ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केली आहे. तसेच आरोपी रमेश (भटजी) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस पुढील चौकशी करत असून या संबंधित अजून कोण दोषी असेल, या दिशेनेही तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.