फेब्रुवारीतच बसणार उन्हाचे चटके

फेब्रुवारीतच बसणार उन्हाचे चटके

राज्यभरातून थंडीनं काढता पाय घेतल्यानंतर हळूहळू आता उन्हाळा येत असल्याची जाणीव करून द्यायला सुरुवात केलीच होती की त्यातच आता हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या काळात तापमान ३७ ते ३९ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारी ११ ते ४ या वेळेत काळजी घेण्याचं हवामान खात्यानं आवाहन केलंय.

हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा इशारा दोन दिवसांसाठी म्हणजे सोमवार आणि मंगळवार दिला आहे. सोमवारी मुंबई, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी इशारा दिला आहे. तर मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा उन्हाळा लवकर आला आहे. सध्या तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी हा वसंत ऋतूचा महिना आहे. यावेळी वसंत ऋतु पूर्णपणे गायब आहे. देशाच्या बहुतांश भागात थंडीनंतर थेट उष्मा जाणवू लागला आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये कमाल तापमानात वाढ होत आहे. येथील बहुतांश भागात या दिवसात तापमान सामान्य पेक्षा 9 अंश सेल्सिअसने जास्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version