Buldhana Crime : अर्धवट जळलेलं धड, कुजलेले शिर ओळख पटू नये म्हणून…; बुलढाण्यात सुन्न करणारी घटना उघडकीस

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक सुन्न करणारी बातमी समोर येत आहे.
Buldhana Crime : अर्धवट जळलेलं धड, कुजलेले शिर ओळख पटू नये म्हणून…; बुलढाण्यात सुन्न करणारी घटना उघडकीस

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. रसलपूर जवळील राजुरा लघु प्रकल्पाच्या परिसरात एका अज्ञात महिलेचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरवातीला या महिलेचे कुजलेले शिर आढळून आलेल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र नंतर या महिलेचे अर्धवट जळलेल्या अवस्थेतील शिरच्छेद झालेले धड देखील मिळून आहे.

महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली असून, ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. राजुरा प्रकल्पाजवळ शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. मात्र, अद्याप या मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version