वांगी पिकावर शेतकऱ्याने रोटर फिरविला

वांगी पिकावर शेतकऱ्याने रोटर फिरविला

शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे. कांदा, मेथी, कोबी, वांगी या पिकांसोबत भाजीपाला पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाल्याने सावकी येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर बुधवारी रोटर फिरवला आहे.

बोरसे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर तीन महिन्यापूर्वी वांगीची लागवड केली होती. महिन्याभरापासून उत्पादन सुरु झाले होते. मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नसल्याने शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून वांगी पिकावर रोटर फिरवला. वांगी पिकासाठी वापरण्यात आलेली खते, औषध फवारणीचा साधा खर्चही या पिकातून निघणार नसल्यामुळेच धनंजय बोरसे यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या पिकावरही ट्रॅक्टर फिरवून कांदा मातीत घातला होता.

काही दिवसांपासून कांदा, वांगे, आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च करून भाजीपाला पीक घेतले होते. मात्र वांगीला एक रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे बोरसे यांनी पिकावर रोटर फिरण्याचा निर्णय घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version