मोबाईल गेमच्या आडून धर्मांतराचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला असताना याप्रकरणी एका पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शिवी बाहेर पडली. त्यानिमित्ताने चित्रा वाघ यांनी आव्हाडांना धारेवर धरलं असता आव्हाड यांनी ट्विटद्वारे वाघ यांच्यावर प्रतिहल्ला केला. शिवी दिली नसल्याचं सांगतानाच ट्विटमध्ये आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या चारित्र्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर सांकेतिक उल्लेख केले. त्यामुळे, संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले आव्हाड ?
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले “विनोद”…. आत्ता बस
आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे …मी सहन करतो … पण मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे …. अजून खूप बोलू शकतो …. बहिणीला संभाळून घेत आलो … पण……
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्यहनन करणारी तुमच्यासारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्दैव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची? ही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही. पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये. तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू. तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस. हे लक्षात ठेव.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.