महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दोन-तीन दिवासंपुर्वी अजित पवार नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आणि या सर्व चर्चांवर पडदा टाकला. अजित पवारच्या या वक्तव्याने चांगलंच राजकारण तापणार आहे.
अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळ समूहाच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी यांनी राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे असं वक्तव्य केलं होत त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.