केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, कुस्तीपटूंशी बोललोय आणि सलग दोन दिवस चर्चा सुरू राहिल्यात. यावेळी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या दीड महिन्यांपासून कुस्तीपटू सरकारकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची मागणी सातत्यानं करत आहेत. यावर मात्र भाजप सरकार मूग गिळून गप्प बसल्याची आणि बृजभूषण यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कुस्तीपटू सरकारकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची मागणी सातत्यानं करत आहेत. यावर मात्र भाजप सरकार मूग गिळून गप्प बसल्याची आणि बृजभूषण यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत. अशातच आता याप्रकरणी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मौन सोडलं आहे. सरकारचीही आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशीच इच्छा आहे, असं ते म्हणाले.
भाजप सरकारचा उल्लेख करत “आम्ही खेळ आणि खेळाडूंना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहू” असे अनुराग ठाकूर कुस्तीपटूंच्या आरोपांबाबत बोलताना म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.