मिलिंद गवळींचा तो किस्सा

मिलिंद गवळींचा तो किस्सा

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अशातच नुकतेच मालिकेला वेगळे वळण आले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. दरम्यान अभिनेते मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. त्यांची भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षक त्यांच्यावर भरपूर प्रेम करतात.अभिनेते मिलींद गवळी समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. ते सतत त्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

सध्या अभिनेते मिलिंद गवळी यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. यावेळी आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की,” शूटिंग मध्ये सगळ्यात कठीण काम का असेल तर लहान बाळांबरोबर ,लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणे हे सगळ्यात कठीण काम असते,खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घयायचे असते. हे त्यांना माहितीच नसतं,माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला, माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमामधून काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version