Health Checkup: आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय, ही महापालिका दातांचे मोफत उपचार करणार

सरकारकडून लोकांच्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशातच आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Health Checkup: आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय, ही महापालिका दातांचे मोफत उपचार करणार

ठाणे: सरकारकडून लोकांच्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशातच आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील टेंभी नाका येथील सी. आर. वाडिया या केंद्रात सुपरस्पेशालिटी दंत चिकित्सा विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दोन दंत चिकित्सकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आगामी काळात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना खास सुविधा मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा: Agriculture News: कृषी यांत्रिकीकरण योजनेत महत्त्वपूर्ण बदल, एक लाख रुपयांची मर्यादा रद्द

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा
रुग्णालयात दात स्वच्छ करणे, रुट कॅनल, दात काढणे, सिमेंट भरणे इत्यादींसह आणखी महत्त्वाच्या सुविधा मिळतील. पहिल्या टप्प्यात या सुविधा दिल्या जात असल्या तरी पुढील काळात दात इम्प्लांटसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

ठाणे महापालिकेच्या हद्दीत आयुष्यमान आरोग्य मंदिर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. अशातच आता ठाणेकरांच्या दातांच्या तपासण्या देखील मोफत होणार आहेत. खासगी रुग्णालयात साधा दात काढण्यासाठी गेल्यावर एक ते तीन हजारांचा खर्च येतो. तर रुट कॅनल आणि इतर उपचारांचा खर्च अनेकांच्या खिशाला परवडत नाही. त्यात रुग्णालयात दाखल करावे लागत नसल्याने मेडिक्लेममध्ये देखील दातांवरील उपचारांचा खर्च मिळत नाही. त्यामुळे सर्व लोकांना ठाणे महापालिकेच्या या नव्या योजनेचा फायदा होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version