Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam : कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात कलह

खेड तालुक्यातील कोरेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला.
Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam : कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात कलह

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आक्रमक अंदाजात दिसले. खेड तालुक्यातील कोरेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला. भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा खरपूस समाचार घेतला असून त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, “सुपडा साफ होणार आहे… होणार आहे की, नाही? जाऊद्या पैसा भिसा… बर मगं रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो… त्याच्या डोक्यावर परिणार झाला आहे. तो येडाच आहे… खरं तर मी एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन बोलत नाही… सारखा तो माझ्यावरून बोलतोय… परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथे पण… मी अरे तूरे करत नाही, पण आता मी त्याला अरे तुरेच करणार…” 

Mhada : म्हाडाच्या योजनेवर तांत्रिक अडचणींचे सावट, अलिशान घरांबद्दल मोठी अपडेट समोर
आता या टीकेला रामदास कदम काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच यावर रामदास कदम यांनी पलटवार करत म्हटले की, “त्यांच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे… गुहागर मतदारसंघासह सर्वठिकाणी त्याला पराभवाला सामोरे दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भूंकत चालला आहे… मी एवढचं म्हणेन कुत्ते तो भूंकते है हाथी अपने आप चलता है… अशा भूंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे आहे. या भास्करला हा कृतघ्न आहे, याला मी शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मिळायला लावली. याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला… आता हा कृतघ्न झाला आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version