जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
जगभरात साखरेचे दर कोसळल्याने कारखानदारांबरोबरच आता शेतकरीही अडचणीत सापडलाय. कारखानदारांनी अगोदर जाहीर केल्याप्रमाणे एफआरपी आणि अधिक दोनशे रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना करतेय, तर साखरेचे दर उतरल्यामुळे पैसे द्यायचे कुठून, हा प्रश्न कारखानदारांसमोर निर्माण झालाय.
शासनानं साखरेवर प्रति टनाला अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ठरल्याप्रमाणे दर मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.