दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी…

दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी…

देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. फक्त रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहे. केवळ सुरक्षित फटाके फोडण्यास न्यायालयाची परवानगी आहे. तसंच फटाक्यांची आॅनलाईन विक्री करता येणार नाही. 

फटाक्यांसदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. देशभरातल्या पर्यावरणप्रेमींचे या निकालामुळे दिलासा मिळाला असावा. 

गेल्या वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोर्टाने हा निर्णय दिला होता. याच धर्तीवर देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. 

प्रदूषणाचा थेट परिणाम देशाच्या युवा पिढीवर होतो त्यामुळे फटाके विक्रीवर बंदी घालणेच योग्य असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version