बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याला वाचवण्यात यश

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याला वाचवण्यात यश

परभणी, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: परभणीच्या मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारात सुनील दगडू यांच्या शेतात उक्कलगाव येथील सोहम (गोलू) सुरेश उक्कलकर हा चार वर्षीय बालक खेळताना दुपारी बोअरवेल च्या खड्डयात पडला. त्याला बाहेर काढण्याचे जिल्हा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता चिमुरड्याला वाचवण्यात यश आले आहे.

जिल्हा शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला बोलवलं होते. पथकाने जेसीबीच्या साह्याने मदतकार्य सुरु केले होते. खड्ड्यामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा केला जात होते. सोहम अंदाजे पंधरा फुट खोल खड्यात अडकला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. चिमुरड्याचा श्वासोच्छवास चालू असल्याने त्याच्या जीवास धोका झालेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version