देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील एकूण रुग्णांच्या ७७ टक्के रुग्ण हे १० राज्यांतील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वरचढ आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत, काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याने कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा उच्चांक असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेत दिली आहे. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ‘देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे निरीक्षण सुरु आहे. देशातील एकूण रुग्णांच्या ७७ टक्के रुग्ण १० राज्यांमधील आहेत. तर देशातील कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत. हे रुग्ण महाराष्ट्र, ओडिसा, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आले आहेत.’ असे ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version