केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली. अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषदेसह शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती आहेत.
आज अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरील अहमदनगरमधील प्रवरानगरमध्ये पहिली सहकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या प्रवरानगरमध्ये बोलताना ही भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.
तसेच यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्राच्या सहकारी बॅंकेवर चर्चा केली. ते म्हणाले, सुरूवातीला महाराष्ट्राच्या सहकारी बॅंकांची देशात चर्चा होती, मात्र नंतर त्या बॅंकांमध्ये कोणी घोटाळे केले? असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थत केला आहे. तसेच राज्य सरकारने सहकार क्षेत्राकडे लक्ष द्यावे, अशी टीकासुद्धा अमित शहा यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.