दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी…

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी…

जय महाराष्ट्र न्यूज, मंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाइन पाहता येणार आहे तर या निकालानंतर उद्यापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्जही करता येणार आहेत. यंदाच्या या निकालाची बाजीसुद्धा मुलींनीच मारली आहे.

राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के लागला असून कोकणने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. यावर्षी 33 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 4 हजार 28 आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version