Solapur Airport: सोलापूरकरांसाठी मोठी खुशखबर! 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार मुंबई विमानसेवा; वेळापत्रकही जाहीर

तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली सोलापूर-मुंबई स्टार एअर विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातील चार दिवस ही सेवा उपलब्ध असून वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर करण्यात आले आहेत.
Solapur Airport: सोलापूरकरांसाठी मोठी खुशखबर! 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार मुंबई विमानसेवा; वेळापत्रकही जाहीर

सोलापूर: सोलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे काही काळ बंद असलेली सोलापूर-मुंबई विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. २ ऑगस्ट २०२६ पासून स्टार एअरलाईन्सकडून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी तसेच उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याचेही सांगितले जात आहे.
स्टार एअरलाईन्सची सोलापूर-मुंबई विमानसेवा २८ जून २०२६ पासून तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अखेर हा प्रश्न मार्गी लागला असून आता विमानसेवा नियमितपणे सुरू होणार आहे.
स्टार एअरलाईन्सकडून ही सेवा आठवड्यातील चार दिवस उपलब्ध असेल. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी विमान उड्डाण करणार आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक

सोमवार आणि बुधवार
सोलापूर आगमन – सायंकाळी ५.१० वाजता
सोलापूरहून प्रस्थान – सायंकाळी ५.४० वाजता

शुक्रवार आणि रविवार
सोलापूर आगमन – दुपारी १.३० वाजता
सोलापूरहून प्रस्थान – दुपारी २.०० वाजता

दरम्यान, विमानसेवेचे संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीटांचे दर स्टार एअरलाईन्सच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा मिळणार आहे.

सोलापूर आणि मुंबईदरम्यानची हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाल्यामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version